आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:कंदुरीच्या जेवणातून 20 जणांना झाली विषबाधा, नांदेड जिल्ह्यात हरीलाल तांडा येथील घटना

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जावळाच्या कार्यक्रमानिमित्त गांधीनगर जवळील हिरालाल तांडा (ता.कंधार) येथे कंदुरीच्या जेवणातून विषबाधा झाल्याने २० जणांना मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बळीराम बद्दुसिंग राठोड (रा.हिरालाल तांडा ता.कंधार) यांच्या घरी ३१ मे रोजी जावळाच्या कार्यक्रम होता. त्यानिमित्त १ जूनला कंदुरीचे जेवण होते. बुधवारी पारूबाई नामदेव राठोड (५०), काजल अशोक चव्हाण (२५), शांताबाई गंगाराम चव्हाण (५४), दिलीप बळीराम राठोड (२५), कलावती परशुराम राठोड (५५), सुनीता रामराव राठोड (३६), सविता सुनील आडे (२२), जिजाबाई महादेव राठोड (१०), निळकंठ माधव पवार (२५), दीपक रामराव राठोड (२२), यमुनाबाई उत्तम राठोड ( ४०), सुरेखाबाई अशोक चव्हाण (३५), राजेश माधव पवार (३०), अप्पाराव जाधव (७०), बळीराम बदुसिंग राठोड (५५), मुकींद भगवान पवार (६०), समाधान सिताराम जाधव (१८), ओमकार बालाजी जाधव (१२), आयुष रमेश जाधव (१२), सोनाबाई निळकंठ पवार (३०) यांना मळमळ व उलटी, जुलाब झाले. आता प्रकृती चांगली आहे.

बातम्या आणखी आहेत...