आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:जीवघेणा हल्ला, खून प्रकरणात 23 वर्षे शिक्षा

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दोन व्यक्तींमधील भांडण सोडवण्यास गेलेल्या दोन नातेवाइकांना मारहाण करून त्यांना जखमी केल्यानंतर एकाचा मृत्यू झाला. ही घटना २०१३ मध्ये घडली. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई. बांगर यांनी २३ वर्ष ६ महिने आणि १ लाख १५ हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली.

१३ ऑगस्ट २०१३ रोजी शेख जावेद शेख कदीर यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. भिमराव अशोकराव पोहरे (२७) व गणेश कोंडला यांचे भांडण सुरू होते. त्यावेळी फिर्यादीचे वडील शेख कदीर शेख वहिद (५५) हे भांडण सोडवण्यासाठी गेले. यावेळी अली शाह उमर शाह (२२) हा तरुणही तेथे होता. त्याच्यावर वार केल्याने तो जागीच मृत्युमुखी पडला. भिमराव पोहरेन त्याला मारून काटेरी झुडूपात फेकून दिले. विमानतळ पोलीसांनी आरोपी भिमराव अशोकराव पोहरे (२७) यास अटक केली. संपूर्ण तपास करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. १३ साक्षीदारांचा जबाब : खून आणि जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात एकूण १३ साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले.

बातम्या आणखी आहेत...