आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बियाणी खून प्रकरण:16 जणांविरुद्ध 4123 पानांचे दोषारोपपत्र दाखल

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांचा ५ एप्रिल रोजी त्यांच्या घरासमोर दोन अज्ञातांनी बंदुकीच्या गाेळ्या झाडून खून केला हाेता. या घटनेच्या अनुषंगाने विमानतळ पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. दरम्यान, या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. १६ आराेपींविरुद्ध मोक्का न्यायालयात शुक्रवारी (७ आॅक्टाेबर) ४,१२३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले.

या गुन्ह्यात इंद्रपालसिंग ऊर्फ सन्नी तिरतसिंग मेजर, मुक्तेश्वर ऊर्फ गोलू विजय मंगनाळे, सतनामसिंग ऊर्फ सत्ता दलबिरसिंग शेरगिल, हरदीपसिंग ऊर्फ सोनू पिनीपाना सतनामसिंग बाजवा, गुरमुखसिंग ऊर्फ गुरी सेवासिंग गिल, करणजितसिंग रघबिरसिंग शाहू, हरदीपसिंग ऊर्फ हार्डी ऊर्फ लकी बबनसिंग सपुरे, कृष्णा ऊर्फ पप्या धोंडिबा पवार, हरीष मनोज बाहेती, रणजित सुभाषराव मांजरमकर, सरहानबिन अली अलकसेरी, गुरुप्रीतसिंघ ऊर्फ दान्या ऊर्फ सोनी गुलझारसिंघ खैरा, कमलकिशोर गणेशलाल यादव आदींना अटक झाली आहे. फरार आरोपी हरविंदरसिंग उर्फ रिंदा चरणसिंग संधू, सुनील उर्फ दीपक सुरेश (रा. सुरखापूर, जि. झज्जर, हरियाणा), दिव्यांशू ऊर्फ पहिलवान रामचेत (रा. कुतुबपूर पोस्ट, पुराबझार, जि. अयोध्या, उ. प्रदेश) यांचा गुन्ह्यात सहभाग दिसून आला. या गुन्ह्याचे तपासिक अधिकारी सहायक पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी १६ आरोपींविरुद्ध ४,१२३ पाने समाविष्ट असलेले दोषारोपपत्र तयार केले. मोक्का न्यायालय येथे ७ ऑक्टोबर रोजी दाखल केले.

विशेष पथकाची कामगिरी नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या नियंत्रणाखाली अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. या पथकाने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात जाऊन या प्रकरणाचा तपास करत आरोपींना अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...