आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:चोरीचा सहा लाखांचा ऐवज जप्त

नांदेड15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन ते तीन टन वजनाचे साहित्य चोरून हैदराबाद येथे घेऊन गेलेल्या चोरट्याला शिवाजीनगर गुन्हे शोधपथकाने २४ तासांत पकडून आणले. चोरलेला ६ लाखांचा ऐवज जप्त केला.

नांदेडमध्ये सर्वत्र सार्वजनिक रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यातील अनेक मोठ्या वजनाचे साहित्य रस्त्यावरच ठेवलेले असते. प्रदीप किशन बाविसकर यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कंपनीचे एक पोकलेन नाईकनगर हद्दीतील चौकात ठेवलेले होते. त्यातील २-३ वजनाचे ब्रेकर कोणीतरी चोरून नेले. शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक डॉ. नितीन काशीकर यांनी पथकाला आदेश दिले. त्याप्रमाणे सहायक पोलिस निरीक्षक रवी वाहुळे यांच्यासह पथकाने ६ लाखांच्या साहित्यासह किरण ज्योतिबाराव बल्लाळ (रा. मनाठा, ता. हदगाव) याला २४ तासांत पकडले.

बातम्या आणखी आहेत...