आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तीचा मेळा:40.8 अंश सेल्सियस तापमानात गोदापात्रात शिरापुरीची महापंगत,  8 ते 10 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

परभणी/नांदेड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणीत बुधवारी पारा ४०.८ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली. हे तापमान यंदाच्या उन्हाळ्यातील परभणीचे सर्वाधिक तापमान ठरले आहे. मराठवाड्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागात तज्ज्ञांनी वर्तवला. दरम्यान, तापमान चाळिशी पार असतानाही पाथरी तालुक्यात गुंज येथे योगानंद सरस्वती महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाेदावरीच्या नदीपात्रात महाराष्ट्र, गुजरातमधून आलेल्या ८ ते १० हजार भाविकांनी शिरापुरीच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात ३१ मार्च ते २ एप्रिलदरम्यान तर औरंगाबाद जिल्ह्यात १ एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ.के.के.डाखोरे यांनी वर्तवली.

बातम्या आणखी आहेत...