आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीन लातूरचा वसा:1,184 दिवसांत लावले 89 हजार वृक्ष

लातूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या ८० सदस्यांनी २०१९ पासून लातूर शहरात ८९ हजार पेक्षा अधिक लहान-मोठे वृक्ष नुसतेच लावले नाहीत तर जगवलेही आहेत. डॉक्टर, इंजिनिअर, व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक, शेतकरी असा समाजातील प्रत्येक घटक त्यांच्याशी जोडला गेला आहे. विशेष म्हणजे कुठलीही संस्था, संघटना किंवा अनुदानावर कार्य चालत नसून सोशल मीडिया ग्रुपद्वारे आदल्या दिवशी वृक्ष लागवडीचे नियोजन ठरते आणि दररोज पहाटे ५.३० ते ९.३० या वेळात चार तास श्रमदान करत आहेत.

२८ ऑगस्टला ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या कार्याला ११८४ दिवस पूर्ण झाले. या काळात टीमचे कार्य अविरतपणे सुरू आहे. साधारणत: जून ते डिसेंबरदरम्यान टीमचे वृक्ष लागवडीचे काम चालते. त्यानंतर पावसाळा येईपर्यंत लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्यासाठी काम केले जाते. ग्रीन लातूर टीममध्ये डॉ. पवन लड्डा, नगरसेवक इम्रान सय्यद, डॉ. भास्करराव बोरगावकर, पद्माकर बागल, डॉ. कल्याण बरमदे, मिर्झा मोईझ, सुलेखा कारेपूरकर, प्रो. मीनाक्षी बोडगे, कल्पना कुलकर्णी, दयाराम सुडे, विमल रेड्डी, सीताराम कंजे, विजयकुमार कठारे आदींचा समावेश आहे.

झाडे, टँकरसाठी प्रायाेजकत्व घेऊन सदस्यांकडून कार्य ^ग्रीन लातूर टीमची ८० सदस्यांची टीम आहे. प्रत्येक सदस्य त्यांच्या मित्रांकडून वाढदिवसानिमित्ताने झाडे किंवा पाणी टँकरचे प्रायोजकत्व घेतो. कुठल्याही मीटिंग, बैठका न घेता सर्व नियोजन व्हॉट्सअॅप ग्रुपवरच चालते. आजवर कडुनिंब, वड, पिंपळ, बकुळ, तामन, कांचणार, अर्जुन, कदंब, मोहगणी, शिरीष, पर्जन्य वृक्ष, गुलमोहर, बेल, चिंच, पारिजातक आदी वृक्षांची लागवड केली आहे. - डाॅ. पवन लड्डा, सदस्य ग्रीन लातूर वृक्ष टीम.

बातम्या आणखी आहेत...