आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बस-कंटेनर समोरासमोर धडकले; सहा प्रवासी जखमी

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुखेड तालुक्यातील मौजे दबडे शिरूर-मुखेड-लातूर राज्य महामार्गावरील मुखेडनजीक असलेल्या दबडे शिरूर पाटीजवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. एसटी चालक, वाहक यांच्यासह बसमधील दोन प्रवासी व इतर दोन असे एकूण सहा प्रवासी जखमी झाले. दरम्यान, ही घटना सायंकाळी ६ वाजता घडली. दरम्यान कंटेनरचालक फरार झाला आहे.

मुखेड आगाराची बस (एमएच २० बीएल २२२८) ही कामजळगा या गावावरून प्रवाशांना घेऊन मुखेडकडे येत होती. तर कंटेनर (जी.जे.०५ बी.एक्स ७६४२) हा मुखेडकडून लातूरला जात होता. कंटेनर चालकाने दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करण्याच्या नादात मुखेडकडे येणाऱ्या एसटीला दबडे शिरूर पाटील येथे समोरासमोर धडक दिली आहे. ही धडक एवढी जोराची होती की एसटीचा समोरचा भाग चकाचूर झाला. या घटनेत एसटी चालक रामदास कबीर (४०), वाहक एम.एन.पांढरे व एसटीमधील प्रवासी रघुनाथ मस्कले (५०), पुष्पाबाई बनसोडे (५३) हे जखमी झाले. दरम्यान, कंटेनर चालकाने या अपघाता आधी रस्त्याच्या कडेला थांबलेल्या बालाजी गणपतराव हाके (३५) या पादचाऱ्याला धडक दिली. यात हाके हे गंभीर जखमी झाले. दरम्यान कंटेनरमध्ये बसलेले प्रवासी देवीदास राठोड (५५) हेसुद्धा गंभीर जखमी झाले. एसटी चालक रामदास कबीर यांचे दोन्ही पाय अडकल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी तब्बल अर्धा तास लागला. पुढील उपचारासाठी त्यांना नांदेडला हलवण्यात आले.

शिरूर-मुखेड-लातूर राज्य मार्गावरील दबडे शिरूर पाटीजवळ बस व कंटेनरची समोरासमोर धडक झाली. यात बसची अशी अवस्था झाली.

बातम्या आणखी आहेत...