आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार घेऊन ठाण्यामध्ये‎ येत आत्महत्येचा प्रयत्न:महिलेसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल‎

नांदेड‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या‎ त्रासाला कंटाळून त्यांच्याविरुद्ध तक्रार ‎ ‎ घेऊन आलेल्या एका विवाहित‎ महिलेने ठाण्यात विषारी औषध घेऊन ‎ ‎ आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ‎ ‎ शिवाजीनगर पोलिस ठाण्यात‎ शनिवारी ही घटना घडली. अचानक ‎ ‎ घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची‎ काही वेळ धावपळ उडाली. या‎ प्रकरणी सदर महिलेसह सासरच्या ‎ ‎ मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ‎ ‎ आला.‎ ४ मार्च रोजी एक महिला सासरच्या ‎ ‎ मंडळीविरुद्ध तक्रार देण्यासाठी ‎ ‎ शिवाजीनगर ठाण्यात आली होती. या ‎ ‎ महिलेने कर्तव्यावर असलेल्या पोलिस‎ अंमलदाराकडे अर्ज दिला. पोलिस‎ अंमलदार तो अर्ज वाचत असताना‎ त्या महिलेने आपल्या पर्समधील पुडी‎ काढून काही तरी खाल्ल्याचे पोलिस‎ अंमलदारांनी पाहिले. सुरुवातीला‎ आजारी असल्याने औषध घेतले‎ असेल, असा अंदाज त्यांनी बांधला.‎ मात्र, महिलेने सांगितले की, लग्न‎ झाल्यापासून आजपर्यंत सासरची‎ मंडळींकडून माझा छळ होत आहे,‎ त्यांच्या त्रासाला कंटाळून मी उंदीर‎ मारण्याचे औषध आताच खात आहे,‎ असे सांगताच कर्तव्यावर असलेल्या‎ पोलिस अंमलदारांची धावपळ‎ उडाली. पोलिसांनी महिलेला‎ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी‎ पाठवले होते.‎

यापूर्वीही केला प्रयत्न‎ या महिलेने यापूर्वीही दोन ते तीन‎ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न‎ केला असल्याची माहिती समोर‎ आला. या महिलेने दिलेल्या‎ तक्रारीवरून सासरच्या चौघांविरुद्ध‎ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎ तर महिलेने आत्महत्या करण्याचा‎ प्रयत्न केल्याने तिच्याविरुद्धही‎ श‍िवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा‎ दाखल करण्यात आला. या‎ प्रकरणात अधिक तपास पोलिस‎ निरीक्षक मोहन भोसले‎ मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस‎ निरीक्षक माने हे करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...