आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कारला (ता. हिमायतनगर) येथील शेतकरी आठ दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने वैतागले आहेत. त्यामुळे कारला येथील त्रस्त शेतकरी महावितरण कार्यालयावर शुक्रवारी सकाळी धडकले. परंतु येथे एकही अधिकारी उपस्थित नसल्याने खंडू संभा कांबळे या शेतकऱ्याने विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच कारला येथील ग्रामपंचायत सदस्य सोपान बोंपिलवार यांनी मध्यस्थी करत शेतकऱ्यास थांबवले. दरम्यान, आमदार माधवराव पाटील जवळगावकर व हिंगोली लोकसभेचे खा. हेमंत पाटील या दोन्ही नेत्यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावून दोन दिवसांत डीपी उपलब्ध करून द्या, अशा सूचना दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.