आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढळला गावठी कट्टा:ऑटोचालकाकडे आढळले पिस्तूल, तात्‍काळ केली अटक

नांदेड12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील एका ऑटोचालकाकडे पिस्तूल आढळले असून त्याला अटक केली आहे. नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस हवालदार प्रमोद कराळे गस्तीवर होते. गुप्त माहितीवरून पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली जुना कौठा येथील मामा चौक येथे संशयित थांबलेला ज्ञानेश्वर नरहरी पुंड (३५) याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे एक गावठी कट्टा आढळला. दुसऱ्या घटनेत अब्दुल रहमानोद्दीन अब्दुल शफिउद्दीन (२२) याला हैदराबाद ते मालटेकडी रस्त्यावर ताब्यात घेऊन त्याच्याकडून खंजीर व तलवार जप्त केली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...