आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूचा धाक दाखवून लुटले:ऑटो स्टँडवर थांबलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला लिफ्ट देऊन लुटले

नांदेड18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावाकडे जाण्यासाठी ऑटो स्टँडवर थांबलेल्या एका सेवानिवृत्त शिक्षकाला दोन चोरट्यांनी लिफ्ट दिली. मात्र, काही अंतरावर जाऊन दुचाकी थांबवून चाकूचा धाक दाखवून शिक्षकाला लुटले. त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, दोन अंगठ्या आणि दोन मोबाइल असा एक लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (२७ जुलै) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मुदखेडजवळ घडली.

जिल्ह्यातील मेंढका (ता.मुदखेड) येथे राहणारे सेवानिवृत्त शिक्षक रामा माणिक बोधनवाड (५९) हे कामानिमित्त मुदखेडला गेले होते. दिवसभर काम आटोपल्यानंतर ते सायंकाळी परत ऑटोने गावाकडे जाण्यासाठी भोकर ऑटो पॉइंट येथे थांबले. या वेळी त्यांच्याजवळ एका दुचाकीवरून अनोळखी दोन जण आले आणि लिफ्ट देण्याची तयारी दाखवली. तेसुद्धा दुचाकीवर बसले. पण रस्त्यात त्यांना चाकू दाखवून ९७ हजार रुपयांचा ऐवज लुटला.

बातम्या आणखी आहेत...