आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात मुबलक पाणी असताना स्वातंत्र्यानंतर पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळत नाही. महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. ही स्थिती पाहता देशपातळीवर काम करण्याचा निर्णय “बीआरएस’ने घेतला. बीआरएसला देशभरात समर्थन मिळत असून “अब की बार किसान सरकार’ असा नारा बीआरएसचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिला.
नांदेड येथील सभेत ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना जन्म देणाऱ्या भूमीला नमन करत त्यांनी भाषणाची सुरुवात केली. मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली. त्यातील ५४ वर्षे काँग्रेसचे, तर १६ वर्षे भाजपचे राज्य होते. देशातील आजच्या स्थितीला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत. फक्त “मन की बात’ करून किंवा “मेक इन इंडिया’ अशा घोषणा देऊन जनतेला फायदा होत नाही. मेक इन इंडिया म्हणताना देशातील सर्व गल्लीबोळात चायना बाजार सुरू असल्याची टीका त्यांनी केली. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांत बीआरएसची वाहने फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व वाहनांची सुरुवात शिवनेरी गडापासून केली जाणार असल्याचे ते म्हणाले. देशात गरजेपेक्षा अधिक पाणी उपलब्ध आहे. १ लाख ४० हजार टीएमसी पाऊस होतो. सरकारची इच्छा असेल तर देशातील शेतात पाणी पुरवठा होऊ शकतो. राज्यांमध्ये पाण्यासाठी युद्ध करण्याची गरज नाही. देशाला १०० वर्षे पाणी टंचाई नाही. प्रकल्प बनवा. पाणी टंचाई व पुरापासून वाचू शकतो, असेही त्यांनी सांगितले. २०२४ मध्ये सत्तेल आल्यानंतर महिलांची प्रगती करण्यासह त्यांना लाेकसभा, विधानसभेत ३३ टक्के जागा वाढवून संधी देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.
मनसेचे अनेक जण ताब्यात : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने केसीआर यांची सभा उधळून लावणार असल्याची घोषणा मनसे नेते राज ठाकरे यांनी केली होती. नांदेड जिल्ह्यातील मनसे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना केसीआर यांच्या सभेकडे जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
अदानींएवढे प्रेम जनतेवर हवे
यवतमाळमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आहेत. २ लाख १५ हजार मेगावॅट विजेचा वापर होतो. ४ लाख मेगावॅट उत्पादन होते. २४ तास वीज मिळू शकते. कोळसा मुबलक, तरीही वीजटंचाई आहे. राज्यावर विदेशी कोळसा थोपण्याची गरज नाही. केंद्र सरकारकडून खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अदानींचे गौडबंगाल उघड झाले अाहे. केंद्राने अदानींएवढे प्रेम जनता व शेतकऱ्यांवर दाखवावे, अशी टीका त्यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.