आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचार:आठवर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी तरुणाला 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, अनैसर्गिक पद्धतीने केला लैंगिक अत्याचार

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका आठवर्षीय बालिकेसोबत १६ वर्षे ६ महिने वय असताना अत्याचार करणाऱ्या युवकाला ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाने नियमित न्यायालयाकडे वर्ग केल्यानंतर ५ वर्षांनंतर त्याला अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी ७ वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.

लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल तक्रारीनुसार, २६ नोव्हेंबर २०१६ रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास आठवर्षीय चिमुकली घरासमोर खेळत असताना कृष्णा चांदोजी सूर्यवंशीने उचलून तिला आपल्या घरात नेले. तिच्यासोबत अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक अत्याचार केला. याबाबत २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पोलिस उपअधीक्षक अर्चना पाटील यांच्या समक्ष तक्रारीनंतर कृष्णाविरुद्ध लिंबगाव ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पंडितरावजी कच्छवे यांनी या गुन्ह्याचा तपास करून कृष्णाविरुद्ध ज्युवेनाइल जस्टिस बोर्डाकडे दोषारोपपत्र दाखल केले. या कायद्यातील नवीन सुधारणेनंतर विशेष पोक्सो सत्र खटला न्यायालयात चालला.

बातम्या आणखी आहेत...