आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारनामा:गुगल लोकेशनची तफावत दाखवत मागितली लाच, 20 हजार रुपये मागणारा सहशिक्षक जाळ्यात

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी गुगल लोकेशनमध्ये तफावत असल्याचे सांगून नमूद त्रुटीचे समायोजन करण्यासाठी कागदपत्रे पडताळणी समिती सदस्यासह शिक्षक प्रल्हाद बळीराम खुडे (४०) याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच देण्याची मागणी केली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिक्षक खुडे याला अटक केली.

तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २ मे रोजी तक्रार दिली होती. तक्रारदाराने त्याच्या ६ वर्षे वयाच्या मुलासाठी आरटीईअंतर्गत अर्ज केला हाेता. निवड यादीत तक्रारदाराच्या मुलाची निवड झाल्याने आरटीईत कागदपत्रे पडताळणी समितीने तक्रारदार यांच्या घरी भेट देऊन पडताळणी केली. तक्रारदाराने अर्ज करतेवेळी टाकलेले गुगल लोकेशन व पडताळणी करताना पडताळणी समितीचे सदस्य तथा बळीरामपूर (ता.नांदेड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळेतील सहशिक्षक प्रल्हाद बळीराम खुडे यांनी प्रत्यक्ष पाहिलेले गुगल लोकेशन यामध्ये तफावत असल्याचे सांगून नमूद त्रुटीचे समायोजन करतो, तुम्ही मला २५ हजार रुपये द्या, असे सांगितले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात सहशिक्षक खुडे याने तक्रारदाराला पंचांसमक्ष २० हजारांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल करण्यात आला.