आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:घरात घुसून दोघांनी चाकूचा धाक दाखवून 89 हजारांचा ऐवज लुटला

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दत्तनगर तामसा येथे एक घर फोडून चोरट्यांनी त्यातून ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. रत्नमाला लक्ष्मण चिंतले यांचे दत्तनगर तामसा येथे घर आहे. १ राेजी रात्री त्या घरात झोपल्या असताना घराच्या मुख्य दरवाजाचे बाहेरील कुलूप आणि आतील कडीकोयंडा तोडून दोन चोरट्यांनी आत प्रवेश केला. रत्नमाला यांना चाकूचा धाक दाखवून २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम एक हजार ५०० रुपये असा एकूण ८९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून नेला..

बातम्या आणखी आहेत...