आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेगलूर शहर व परिसरात चोरट्यांचे सत्र सुरूच आहे. सोमवारी (२३ जानेवारी) मध्यरात्री उदगीर रस्त्यावरील हॉटेल तरंगच्या बाजूस असलेल्या घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील चार लाखाचा ऐवज लंपास केला. घरात वास्तव्यास असलेल्या वृद्ध दांपत्याना दोरीने हातपाय बांधून महिलेची हत्या करण्यात आली. चंद्रकला श्रीपतराव पाटील (६५) मृताचे नाव आहे.
उदगीर रस्त्यावर शास्त्रीनगरमध्ये मूळ येडूर (ता.देगलूर) येथील रहिवासी श्रीपतराव रामजी पाटील (९०) हे त्यांच्या पत्नीसह वास्तव्यास आहेत. दरम्यान, सोमवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अज्ञात तीन दराेडेखाेरांनी घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून, त्यांचे व त्यांची पत्नी चंद्रकला यांचे पाय व तोंड कापडाने बांधून मारहाण केली. घरातील साडेबारा तोळ्यांचे सोन्याचे दागिने व ७० तोळे चांदीचे वाळे असा एकूण ३ लाख ८९ हजार रुपयांचा माल जबरीने चोरून नेला. या घटनेत श्रीपतराव यांची पत्नी चंद्रकला पाटील (६५) यांचा मृत्यू झाला. देगलूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.
मालमत्तेवरून कौटुंबिक वाद; आरोपी सीसीटीव्हीत झाले कैद
श्रीपतराव पाटील यांची तिसरी पत्नी चंद्रकला या असून त्यांच्या कुटुंबामध्ये मालमत्तेवरून वाद सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे हा दरोडा आणि त्यातून झालेला खुनाचा प्रकार आहे, की इतर काही घातपाताचा प्रकार आहे. यादृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. ही घटना चोरी प्रकारावरून झाली की, संपत्तीच्या वादातून झाली याचा उलगडा आरोपीला पकडल्यानंतरच निष्पन्न होईल, आरोपीच्या शोधात पथक रवाना केले आहे. घटनेतील आरोपी हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत, असे पाेलिस सूत्रांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.