आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेस हॉटेलमध्ये नेल्याचा राग:तरुणाची नदीकाठी नेऊन हत्या, नांदेडच्या डंकिन येथील घटना

नांदेड3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडच्या डंकिन परिसरात गोदावरी नदीकाठी लाथाबुक्क्या, लाठ्याकाठ्या आणि रॉडने बेदम मारहाण करत वसंतनगर भागातील स्वप्निल शेषराव नागेश्वर (३०) या ऑटोचालकाची २१ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील ७ आरोपींच्या अवघ्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या. “तू पोरीला हॉटेलवर घेऊन जातो का?’ असे म्हणत स्वप्निल व त्याच्यासोबतच्या महिलेस एका टोळक्याने बळजबरी ऑटोत कोंबले. नदीकाठी उर्वशी मंदिराजवळ असलेल्या दर्ग्यासमोर नेल्यावर त्याची हत्या करण्यात आली. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेस मारहाण होत असल्याचे दिसत आहे.

नांदेड शहरात २१ नोव्हेंबर रोजी एका युवकाची गोदावरी नदीकाठी उर्वशी मंदिराजवळ असलेल्या दर्ग्यासमोर हत्या झाली होती. युवकांच्या टोळक्याने स्वप्निल व त्याच्यासोबतच्या महिलेस विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतून उचलून नेत त्याला मारले होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फुटेज खबऱ्यांना दाखवण्यात आले. यानंतर आरोपींची ओळख पटवण्यात आली. त्यात मुख्य आरोपी शायबाज खान एजाज खान असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून पथकाने त्यास ताब्यात घेतले. इतर आरोपींबाबत चौकशी केली असता हा गुन्हा त्याने व त्याच्या इतर १० ते १५ साथीदारांनी मिळून केल्याचे शायबाज खानने पोलिसांना सांगितले. त्यावरून २३ नोव्हेंबर रोजी सर्व आरोपींची ओळख पटवण्यात आली.

महिला अन् आरोपींचे नाते नाही : स्वप्निलला ऑटोत कोंबून २१ नोव्हेंबरला नमस्कार चौकापासून डंकीन परिसरात ५ किलोमीटर अंतरावर नेण्यात आले. व्हायरल व्हिडिओत महिलेला जमावाकडून मारहाण झाल्याचे दिसते. मारहाण करणाऱ्यांपैकी दोघे परिसरातील झुडपातून भिंतीआड लाकडी दांडे घेऊन जात असताना िदसतात. स्वप्निलसोबतची महिला व मारहाण करणारे आरोपी यांच्यात नातेसंबंध असल्याची माहिती नाही. महिलेच्या जबाबावरून कारवाईची पुढील दिशा ठरवली जाईल, असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

या आरोपींना केली अटक शायबाज खान एजाज खान (२४, रा. पक्की चाळ, नांदेड), मोहंमद सदाम मोहंमद साजिद कुरेशी, मोहंमद उसामा मोहंमद साजिद कुरेशी (२०, रा. मिल गेट, नांदेड), शेख अयान शेख इमाम (२०, रा. आसरानगर, नांदेड), सोहेलखान साहेबखान (१९, रा. सुंदरनगर, नांदेड), सय्यद फरान ऊर्फ साहिल सय्यद मुमताज (१९, रा. , मुखेड, ह. मु. आसरानगर, नांदेड), उबेद खान युनूस खान (२३, रा. चौफाळा, नांदेड) यांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...