आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची नात आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांच्या लेक श्रीजया राजकारणात पर्दापण करण्याची शक्यताय. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत त्यांनी लावलेली उपस्थिती यावरून ही चर्चा सुरू झालीय.
श्रीजया यांच्या रूपाने चव्हाण घराण्यातील तिसरी पिढी राजकारणात उतरणार आहे. यावर चव्हाण यांच्याकडून अजून कुठलेही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.
श्रीजया 2019 पासून सक्रिय
अशोक चव्हाणांना दोन मुली आहेत.त्यात श्रीजया यांना राजकारणात विशेष रस आहे. त्यांचे 'एलएलएम'पर्यंत मुंबईत शिक्षण झाले आहे. यापूर्वी त्यांनी अनेकदा वडिलांच्या सभांना हजेरी लावली. विशेषतः 2019 मधल्या लोकसभा निवडणुकीत श्रीजया यांनी अशोकरावांचा जोरदार प्रचार केला. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
जनसंपर्क सांभाळला...
लोकसभेच्या पराभवानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीजया यांनी अशोकरावांच्या प्रचारासाठी पुन्हा कंबर कसली. प्रचारात लक्ष घालत जनसंपर्कापासून साऱ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. या निवडणुकीत चव्हाणांनी बाजी मारली. आता भारत जोडो यात्रेतून त्या राजकारणात उतरल्या असल्याची चर्चा आहे.
विधानसभेसाठी उतरणार...
राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत श्रीजया स्वतः सहभागी झाली. त्यांनी बराच काळ राहुल गांधी यांच्यासोबत घालवला. येणाऱ्या काळात श्रीजया या विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यासाठीच त्यांनी भारत जोडोमधून सक्रिय राजकारणात उतरल्याची तयारी सुरू केल्याचे समजते.
महिलांचा टक्का वाढतोय...
नांदेडमध्ये माजी खासदार भास्करराव खतगावकर यांच्या स्नुषा डॉ. मीनल राजकारणात आहेत. तर भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते संभाजी पवार यांच्या स्नुषा पूनम ही राजकारणात सक्रिय आहेत. त्यात खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची कन्या प्रणिता देवरे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वीच राजकारणात प्रवेश केला आहे. सध्या श्रीजया यांनी राजकारणात प्रवेश केला, तर नांदेड जिल्ह्यात महिलांचा राजकीय टक्का वाढतोय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.