आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणीसाठी आक्रमक:स्मशानभूमीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न, नांदेड जिल्ह्यातील कारेगाव येथील घटना

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यातील कारेगाव (ता.धर्माबाद) येथे स्मशानभूमीच्या मागणीसाठी गावातील पाच जणांनी सोमवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या वेळी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

धर्माबाद तालुक्यातील कारेगाव हे १,४०० लोकसंख्या असलेले गाव आहे. गावात स्मशानभूमीसाठी जागेची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. धर्माबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन आणि उपोषणदेखील करण्यात आले होते. मात्र प्रशासनाकडून दाखल घेण्यात आली नाही, असे आंदोलकांनी सांगितले.

गावात बैठक घेतली
गटविकास अधिकारी यांनीही यासंदर्भात गावात बैठक घेतली आहे. तरीही आंदोलन केले, असे कारेगावचे ग्रामसेवक श्रीपाद जाधव यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
कारेगाव येथील पाच जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.