आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप:सामाजिक तेढ निर्माण करण्‍यात तसेच मुस्लिम विरोधासाठी भाजप जबाबदार : खा. ओवेसी

नांदेड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या मुस्लिमविरोधी वातावरण तयार केले जात आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या वातावरणास भाजपच जबाबदार असल्याचा आरोप एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला.

एमआयएमच्या वतीने नांदेड येथे एक मे रोजी खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपवर कडाडून टीका केली. सध्या देशात हिंदुत्ववादावरून स्पर्धा रंगली आहे. माझे हिंदुत्व खरे का तुझे या वादात जाणीवपूर्वक मुस्लिमविरोधी वातावरण निर्माण केले जात आहे. याला सर्वस्वी भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. देशभरात द्वेषाचे राजकारण केले जात आहे. यात भाजप स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे. सध्या देशात संविधानाविरोधात बोलले जात आहे. देशात कायद्याचे नव्हे, तर बुलडोझरचे सरकार आले आहे, असेही ओवेसी या वेळी म्हणाले. देशातील मुस्लिमांवर अत्याचार सुरू असताना कोणताही पक्ष त्यावर बोलण्यास तयार नाही. यात काँग्रेसचाही समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...