आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लेखोरांवर कारवाईची मागणी:बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींवर शोकाकूल वातावणात अंत्यसंस्कार, काही काळ तणावाचे वातावरण

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर बुधवारी दुपारी गोवर्धनघाट स्मशानभूमती शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी व्यापार्‍यांनी नांदेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.

दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अंत्ययात्रा येताच कोलंबीच्या गावकर्‍यांनी पोलिस यंत्रणेच्या विरोधात घोषणाबाजी करुन काही काळ अंत्ययात्रा थांबवली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी सकाळी 11 वाजता अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळया झाडून हत्या केली.

या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटूंबियांकडे सोपविण्यात आला. मंगळवारी सायंकाळपासून ते बुधवारी अकरा वाजेपर्यंत त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी झाली होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली. सर्वच रस्त्यावर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भरउन्हात नागरिक थांबले होते.

अंत्ययात्रा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रोखली

अंत्ययात्रा जिल्हा पोलिस अधीक्षक कर्यालयासमोर आल्यानंतर प्रक्षुब्ध जमावाने घोषणाबाजी करुन पोलिस यंत्रणेच्या विरोधात आपला संताप व्यक्त केला. हल्लेखोरांना फाशी झालीच पाहिजे, पोलिस प्रशासन हायहाय अशा घोषणा दिल्या.वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी समोर येवून आश्‍वासन दिल्याशिवाय अंत्ययात्रा पुढे जणार नाही. असा पवित्रा अंत्ययात्रेतील नागरिक व गावकर्‍यांनी घेतला.

यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी या प्रकरणातील आरोपी लवकरात लवकर अटक करुन कुणाचाही दबाव सहन न करता आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा करण्याचा प्रयत्न आम्ही युद्धपातळीवर करत आहोत, तुमचे सहकार्य मिळाले तर निश्‍चितच आरोपी अटक होतील, असा विश्‍वास व्यक्त करुन त्यांना आश्‍वसत केले. त्यानंतर अंत्ययात्रा मार्गस्थ झाली.

गोर्वधन घाट येथे शोकसभेत पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची उपस्थिती होती. व्यापार्‍यांनी काढला मुकमोर्चा दरम्यान, सायंकाळी चारच्या सुमारास व्यापार्‍यांनी जुना मोंढा येथून मुक मोर्चा काढला. यात महिला व्यापार्‍यांचाही सहभाग होता. खून प्रकरणातील आरोपीसह जे त्या मागे आहे त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह पालकमंत्री अशोक चव्हाण यांना दिले. तसेच राजस्थानी विप्र समाजाच्या वतीनेही निवेदन देण्यात आले.

पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली खंत
बियाणी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी आणि परिवाराचे सांत्वन करण्यासाठी मंत्री अशोक चव्हाण हे बियाणींच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना गुन्हेगारांना तातडीने पकडण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठ दिवसांपूर्वी मी त्यांच्या कार्यक्रमाला गेलो होतो. अतिशय शांत व मनमिळावू स्वभावाचा संजय होता. त्यांच्या हत्येचा तपास हा वेगाने होईल याची ग्वाही देतो. दरम्यान नांदेडच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी ही घटना असल्याची खंत देखील मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...