आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी निवृत्त अधिकाऱ्यावर गुन्हा

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनपातील तत्कालीन सेवानिवृत्त अपर आयुक्त रामनारायण लक्ष्मीनारायण गगराणी यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री व मुलगा प्रथमेश यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शारदानगर येथील रामनारायण गगराणी यांच्या मालमत्तेची नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली. यात एक मार्च २०१० ते ३० मार्च २०१६ या काळात सेवेत असताना त्यांना कायदेशीररीत्या प्राप्त आर्थिक उत्पन्नाच्या तुलनेत त्यांच्याकडे आढळून आलेल्या अधिक मालमत्तेबाबत ते समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या तुलनेत २८ लाख ७२ हजार ६६० रुपयांची म्हणजेच ४५ टक्के बेहिशेबी मालमत्ता संपादित केल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...