आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब की बार किसान सरकार!:नांदेडमध्ये CM केसीआर यांची घोषणा, म्हणाले- 'मेक इन इंडिया' ऐवजी 'जोक इन इंडिया' झाला

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्यानंतर काॅंग्रेसने 54 वर्षे, तर भाजपने 16 वर्षे सत्ता भोगली. देशातील बजबजपुरीला काॅंग्रेस - भाजप जबाबदार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेक इन इंडिया' बनवणार होते पण 'जोक इन इंडिया' झाला. कुठे गेला 'मेक इन इंडिया' देशातील प्रत्येक शहरात चायना बाजार भरला. दीपावलीचे दिवे, गणेशमूर्ती, राष्ट्रीय ध्वज, फटाके, होळीचे रंगही चीनमधून येतात असे टीकास्त्र सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अबकी बार किसान सरकार असा नारा दिला.

बीआरएस पक्षाची सभा आज नांदेडमध्ये झाली. या सभेला संबोधित करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सीआर बोलत होते.

प्रत्येक दलित कुटुंबाला 10 लाख

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली. “बीआरएस सरकार आल्यास देशातील 24 लाख दलित कुटुंबांना दरवर्ष प्रत्येकी 10 लाख रुपये दिले जाईल”, असे केसीआर म्हणाले.

केसीआर यांनी आज नांदेडमध्ये सभा घेतली. तत्पूर्वी पहिल्याच सभेत मराठवाड्यासह विदर्भातील दोन माजी आमदार बीसीआर पक्षात प्रवेश करणात आहेत. तसेच केसीआर यांच्या सभेत मोठ्या प्रमाणात प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

माझे भाषण गावागावांत पोहचवा

के. चंद्रशेखर राव म्हणाले, देशाच्या विचारधारेला बदलण्याचे राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा आम्ही निश्चय केला. त्यामुळे आम्ही बीआरएसचे उद्घाटन केले. देशात समर्थन मिळत आहे. मी विनम्रतेने पार्थना करतो की, माझे भाषण येथेच विसरू नका. गाव, शहरात गेल्यानंतर या माझ्या भाषणावर चर्चा करा. देशाला चालवण्यासाठी मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. अनेक नेते स्वातंत्र्यानंतर देशाने पाहीले. अनेक मुख्यमंत्री, पंतप्रधान बनले. परंतु भाषण मोठे मोठे येते.

पाणी का दिले जात नाही?

केसीआर म्हणाले, साधी गोष्ट आहे. मी जे सांगतोय ती सोपी गोष्ट आहे. ते राॅकेट सायन्स नाही. आज देशात पिण्याला पाणी मिळते ना..? सिंचनाला पाणी मिळते का? या गोष्टी देशात नाहीत का? सरकार का देत नाही, गौडबंगाल काय आहे ते समजून घ्या. ते समजले तर एकजूट व्हाल.

शेतकऱ्यांचे सरकार बनू शकते

केसीआर म्हणाले, महाराष्ट्रात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या करीत आहेत. काय कारण असावे विचार करा. आत्महत्या कोणताही शेतकरी केव्हा करतो? देशात शेतकऱ्यांची संख्या सोळा कोटी शेतकरी परिवार आहे. मजुरांची संख्याही तेवढीच आहे. त्यामुळे सरकार बनवण्यासाठी मोठे कष्ट उपसण्याची गरज पडणार नाही. या गोष्टीला लोकांमध्ये पोहचवा.

भारत बुद्धीजीवींचा देश

केसीआर म्हणाले, भारत बुद्धीजीवींचा देश आहे. मुर्खांचा देश नाही. देशात आणीबाणी लागली तेव्हा लोकनायक जयप्रकाश नेत्यांच्या एका आवाजाने लोक एकत्रित झाले आणि बलाढ्य नेत्यांना नेस्तनाबूत केले. शेतकऱ्यांना केवळ शेतात नांगर चालवणे नव्हे तर कायदा बनवायलाही शिकायला हवे.

जनतेचा प्रत्येकवेळी पराभव

केसीआर म्हणाले, स्वतः आमदार, खासदार बना तेव्हाच शेतकऱ्यांचे सरकार येईल. निवडणुका लागल्यावर कोणता न कोणता पक्ष जिंकतोच पण जनतेचा पराभव होतो. आता निवडणुका झाल्यास जनतेने, शेतकऱ्यांनी जिंकायला हवे.

भारतात सर्वातजास्त शेतीयोग्य जमीन

केसीआर म्हणाले, भारत गरीब देश नाही. मला राजकीय जीवनाचा पन्नास वर्षांचा अनुभव आहे. आपला देश अमेरिकेपेक्षाही बलवान आहे. नेत्याचे काम दमदार असेल तर आपण अमेरिकेपेक्षाही बलशाली आर्थिक शक्ती बनवू शकतो. भारतात संपत्ती आहे पण संपत्तीपासून जनता वंचित आहे. निसर्गाने पाणी, जमीन, कोळसा आणि काम करणारी जनता आपल्याकडे आहे. अमेरिका, चीन भारतापेक्षा मोठे देश आहे पण त्यांच्याकडे शेतीयोग्य जमीन भारताच्या तुलनेत कमी आहे.

नेते तमाशा बघतात

केसीआर म्हणाले, भारताकडे 83 करोड एकर शेती असून 41 कोटी जमीन शेती योग्य आहे. पाण्याचा अपव्यय होतो नेते तमाशा बघतात. महाराष्ट्र नद्यांनी संपन्न असून पाणी का नाही..? देशात सरकार काॅंग्रेसने 54 वर्षे चालवले. त्यानंतर भाजपने सोळा वर्ष तर अन्य काही तुरळक लोकांनी सरकार चालवले. भाजप आणि काॅंग्रेसने 70 वर्षे सत्ता भोगली. देशाच्या समस्यांसाठी हे दोन पक्ष जबाबदार आहे.

बातम्या आणखी आहेत...