आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार, गडकरी 14 रोजी नांदेडमध्ये

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी १४ मे रोजी नांदेड दौऱ्यावर आहेत. गोदावरी अर्बन मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या ‘सहकारसूर्य’ मुख्यालयाच्या उद‌्घाटन सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार हेमंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उद‌्घाटन सोहळा १४ मे रोजी सकाळी ९ वाजता तरोडा नाका येथे होणार आहे. या वेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हिंगोली, नांदेड, यवतमाळ व परभणी जिल्ह्यातील खासदार, व आमदार आदी मान्यवरांचीही उपस्थिती राहणार आहे. उद‌्घाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...