आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, उमरी व धर्माबाद तालुक्यातील जवळपास ४९ गावांतील नागरी समस्यांच्या मुद्द्यावरून शेजारच्या तेलंगण राज्यात आमची गावे समाविष्ट करावीत ही मागणी घेऊन समन्वय समितीच्या वतीने बुधवारी (७ डिसेंबर) संपर्क संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली. होट्टल (ता. देगलूर) येथील सिद्धेश्वर मंदिरात नारळ फोडून यात्रेला प्रारंभ झाला. दरम्यान, माजी आमदार सुभाष साबणे हे या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. समन्वय समितीने राज्य शासनाकडे २२ मागण्या केल्या आहेत. शेजारील तेलंगणात ज्याप्रमाणे विकास होत आहे तो विकास अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या आमच्या गावात का नाही..? त्यामुळे आम्हाला अनेक यातनांना सामोरे जावे लागत असल्याचे समितीचे म्हणणे आहे. ज्याप्रमाणे मराठवाड्याचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आली होते, त्याप्रमाणे सीमा भागातील विकासासाठी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी समन्वय समितीच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली. होट्टल येथून प्रारंभ झालेली यात्रा येरगी, नागराळ ही गावे मार्गक्रमण करत पुढे गेली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.