आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातेलंगण राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर कंटेनर व कारचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यात चार तरुण ठार झाले. ही घटना सोमवारी (१३ मार्च) पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडली. यात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मृतांत कुंडलवाडी येथील गणेश हानमुल्लू निरडी (२६), आदित्य हानमुल्लू निरडी (२३), प्रकाश सायबू अंकलवार (२२) यांचा तर निझामाबाद येथील साईराम भाळे या चाैघांचा समावेश आ हे. कुंडलवाडीतील (ता. बिलाेली, जि.नांदेड) गणेश, आदित्य, प्रकाश, व निझामाबादमधील साईराम हे चाैघे तेलंगणमधील हैदराबाद येथे काही कामानिमित्त गेले होते. परतीच्या प्रवासात कुंडलवाडीकडे येत असताना सोमवारी पहाटे १.३० वाजेच्या सुमारास निझामबाद जिल्ह्यातील इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे भरधाव कार (एपी २९ एडी ७९०९) व कंटेनरचा (एचआर ३८ यू ७२८१) समोरासमोर भीषण अपघात झाला. यात वरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तेलंगण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी निझामाबाद येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या अपघातातील तीन मुलांपैकी सेवानिवृत्त मुख्याध्यापक गंगाधर निरडी यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे कुंडलवाडी शहरावर शोककळा पसरली.
निझामाबाद जिल्ह्यात इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे कार-कंटेनरच्या अपघातात कारची अशी अवस्था झाली हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.