आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदीग्राम एक्स्प्रेसखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या:एकमेकांना घट्ट धरून रेल्वेसमोर मारली उडी, त्यापूर्वी सोशल मीडियावर स्टेटसही ठेवले

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाने एकमेकांना घट्ट धरून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (११ नोव्हेंबर) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास भोकर रेल्वेगेट परिसरात घडली आहे.

मौजे रिठ्ठा (ता.भोकर) येथील आयटीआय पास झालेली धारा माधव मोरे व भोकर येथील शिवराज मनोज क्यातमवार (दोघे २२ वर्षे) यांचे एकमेकांवर प्रेम होते. शुक्रवारी (११ नोव्हेंबर) दुपारी १२ वाजेपासून ते दाेघेही साेबत फिरत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. टोकाचे पाऊल उचलण्यासंदर्भात दोघांनी स्टेटस ठेवल्याचे त्यांच्या परिचितांनी सांगितले.

दुपारी आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस भोकर रेल्वे गेटजवळ येताच दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार रेल्वे जवळ येत असताना धारा ही शिवराजला पटरीच्या बाजूला जाण्यास सांगत हाेती. परंतु शिवराजने तिला घट्ट पकडल्याने दाेघांना रेल्वेची जाेरदार धडक बसली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...