आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार नाहीत:राज्य सरकार धूर्त, अफवा पसरवली जात आहे; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची टीका

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडून जातील, असे वाटत नाही. त्यांच्याबाबत अफवा पसरवली जात आहे. सध्याचे राज्य सरकार धूर्त आहे, अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली.

चर्चांमध्ये अर्थ नाही

नीलम गोऱ्हे नांदेडमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. गोऱ्हे म्हणाल्या, सध्याचे राज्य सरकार हे धूर्त आहे. शिंदे गटासोबत गेलेल्या मंडळींचे येणाऱ्या निवडणुकीत काय होते ते येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसणार आहे. तसेच, उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय व स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडून कुठे जातील असे मला वाटत नाही. नार्वेकर यांच्याबद्दल अफवा पसरवली जात आहे. पण या चर्चांना काही अर्थ नाही.

शिवसेनेला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, शिवसेनेला खिंडीत गाठण्याचे प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. आगामी मुंबई पालिके निवडणुकीनिमित्त शिवसेनेविरोधात सर्वजण एकवटले आहेत. हिंदी चित्रपटातील नायकाला ज्या पद्धतीने सगळीकडून संकटात आणले जाते, तसेच प्रयत्न शिवसेनेसोबत केले जात आहे.

मातोश्रीला हप्ता, पुरावे द्या!

बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांनी मातोश्रीला हफ्ता जात असे, असा आरोप केला होता. यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मला पक्षाने चार वेळा विधानपरिषदेवर पाठवले. त्यानंतर उपसभापतीपद मिळाले. पण त्यासाठी रुपया खर्चावा लागला नाही. उलट पक्षाने माझ्यासाठी पैसे खर्च केले. जोपर्यंत पक्षासोबत असतो तोपर्यंत दिवाळी, अन्यथा शिमगा असा प्रकार सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत.

ठाकरेंची मते भाजपला मिळाली

शिवसेनेचे उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडून आले, असा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यावर गोऱ्हे म्हणाल्या, भाजपचेही उमेदवार आमच्या नेत्यांचे फोटो लावून निवडून आले. दोघांची मतं एकमेकांना मिळाली. फक्त एकाच पक्षाची मतं दुसऱ्या पक्षाला मिळाली, असे नाही. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख हे खंबीर आहेत. अशा आरोपांमुळे खऱ्या शिवसैनिकाच्या मनावर कुठलाही परिणाम होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...