आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवगिरी एक्स्प्रेस:13 पासून देवगिरीला जोडणार एलएचबी डबे

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिकंदराबाद-मुंबई -सिकंदराबाददरम्यान धावणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसचे डब्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. या किंवा मराठवाड्यातून धावणाऱ्या अन्य गाड्यांची हिच अवस्था आहे. त्यामुळे या गाड्यांचे जुने डबे बदलून नवीन बसवण्यात यावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे विभागाने १३ फेब्रुवारीपासून देवगिरीचे सर्व जुने डबे काढून टाकून त्या ठिकाणी नवे सर्व सुविधांयुक्त एलएचबी डबे बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

कांही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोपासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निमंत्रित केले होते. या संमेलनात मराठवाड्याच्या विकासात राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा या विषयावर बोलताना मराठवाड्याच्या विकासाचा रोडमॅप सांगतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अनेक विषयांवर त्यांच्या भाषणातून प्रकाश टाकला होता.

बातम्या आणखी आहेत...