आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये भीषण अपघात:डिझेल टँकरची ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक, भीषण आगीत 7 वाहने जळून खाक; 3 प्रवासी गंभीर

3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूरमध्ये डिझेल टँकरने ऊसाच्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. धडकेमुळे डिझेल टँकरला आग लागली. क्षणात आगीने रौद्र रुप धारण केल्याने यात या मार्गावरील तब्बल 7 वाहने जळून खाक झाली.

एकेरी वाहतुकीमुळे अपघात

लातूर ते नांदेड महामार्गावर भातखेडा ते भातांगळी दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यामुळे एकेरी बाजुने वाहतूक आहे. लातूरहून नांदेडच्या दिशेने जाणारा टँकर भातांगळीजवळ आला, तेव्हाच ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टरही याच मार्गावरून जात होता. यावेळी टँकरने ट्रॅक्टरला धडक दिली. यामुळे डिझेलच्या टँकरने अचानक पेट घेतला.

प्रवासी जखमी

टँकरच्या बाजुनेच जात असलेल्या एका बसलाही या अपघाताचा फटका बसला. काही क्षणात डिझेलच्या टँकरचा भडका उडाला. त्यामुळे बससोबत मार्गाववरील इतर वाहनेही आगीच्या कवेत आली. बुधवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. माहिती मिळताच आग्निशमन दल व लातूर ग्रामिण पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री 11.30 वाजेपर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अपघातात तीन प्रवासीही जखमी झाल्याची माहिती आहे. ​​​​​​

अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बाजूलाच असलेल्या मांजरा नदीपात्रातून पाण्याची सोय करण्यात आल्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यात यश आले. त्यातच कापसाच्या गाठी वाहतूक करणारा ट्रकही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागला.

अपघाताचे कारण अस्पष्ट...

अपघाताबाबत पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. नेमक्या किती वाहनांनी पेट घेतला. किती नुकसान झाले, हे आग आटोक्यात आल्यानंतर पंचनाम्यानंतर समोर येणार आहे. यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर टँकरने पेटला आहे, अशी माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...