आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान कार्ड लिंक करण्यात निरुत्साह:नांदेडमध्ये फक्त 28% ‘आधार’शी लिंकिंग

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याच्या मोहिमेला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली. परंतु, या दोन महिन्यांत शहरी भागातूनच मतदारांचा निरुत्साह दिसून येत आहे. नांदेड उत्तरमध्ये केवळ २८ तर, दक्षिणमध्ये ३४ टक्के मतदारांनी ओळखपत्र आधार कार्डशी जोडले आहे. उलट ग्रामीण भागात हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत गेले आहे. प्रशासनाला आणखी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीने जर आपले नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात जास्त वेळा नोंदवल्यास ते शोधून काढणे सोपे होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अध्यक्षतेखाली या मोहिमेस एक ऑगस्टपासून सर्वत्र सुरूवात झाली आहे. आधार कार्डची माहिती अाेळखपत्राच्या माहितीशी लिंक केल्याने मतदारांची खासगी माहिती वैधानिक प्राधिकरणाला उपलब्ध होईल. त्यानंतर मतदारांवर मर्यादा येतील.

ही मोहीम केंद्र सरकारच्या निवडणूक सुधारणा कार्यक्रमाचा एक भाग आहे. यासाठी जिल्हास्तरावरही ठिकाठिकाणी कॅम्प घेऊन मतदार ओळखपत्राशी आधारची जोडणी करून घेण्यात आली.

नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील लेखाजोखा तालुका एकूण मतदार लिंक केलेल्यांची संख्या टक्के किनवट २,६५,९६९ १,१७,१५० ४४ हदगाव २,८९,५५३ १,८८,२३५ ६५.०१ भोकर २,९१,९५६ १,७७,७५१ ६०.८८ नांदेड उत्तर ३,२८,०२८ ९१,८४७ २८ नांदेड दक्षिण २,९८,७७४ १,०२,१९५ ३४.२० लोहा २,८६,१२० १,९६,६८३ ६८.७४ नायगाव २,९८,०२० १,८६,७२८ ६२.६६ देगलूर ३,०४,६१९ १,९२,५२९ ६३.२० मुखेड २,९०,६९७ २,१९,६०२ ७५.५४

बातम्या आणखी आहेत...