आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य रेल्वेने कळवल्यानुसार, मनमाड ते अंकाई किल्ल्यादरम्यान दुहेरीकरण, यार्ड री-माॅडेलिंग आणि इतर संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत, तर काही उशिरा धावणार आहेत. काही रेल्वेगाड्या मार्ग बदलून धावणार आहेत.
२३ जूनला विशाखापट्टणम-साईनगर शिर्डी (१८५०३), २४ राेजी साईनगर शिर्डी-विशाखापट्टणम (१८५०४), २५ ते २८ जूनदरम्यान सीएसटी मुंबई-जालना (१२०७१), २६ ते २९ दरम्यान जालना- सीएसटी मुंबई, २७ व २८ जूनला सीएसटी मुंबई-आदिलाबाद (११४०१), २६ ते २७ राेजी आदिलाबाद - सीएसटी मुंबई (११४०२), २६ राेजी दादर-काझीपेट (०७१९८), २५ राेजी काझीपेट-दादर (०७१९७), २६ राेजी काझीपेट -पुणे (२२१५२) २४ राेजी पुणे-काझीपेट (२२१५१), २७ व २८ जून जालना-श्री साईनगर शिर्डी (०७४९१), २७ व २८ जून राेजी श्री साईनगर शिर्डी-जालना (०७४९२), २४ राेजी जालना-नगरसोल (०७४९३), २४ व २६ राेजी नगरसोल-जालना (०७४९४) २६ जूनला जालना-नगरसोल (०७४९७) या गाड्या पूर्णत: रद्द झाल्या अाहेत.
नगरसोलदरम्यान २४ ते २७ दरम्यान अंशत: रद्द
शिर्डी-काकीनाडा (१७२०५) २६ व २८ जून, सिकंदराबाद-शिर्डी (१७००२) २४ व २६ जून, श्री शिर्डी - सिकंदराबाद (१७००१) २५ व २७ जून, मनमाड-सिकंदराबाद (१७०६३) २५ ते २८ जून रोजी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली.
अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या
नांदेड-मनमाड (०७७७७) गाडी १९ ते २७ जून रोजी रोटेगाव-मनमाड-रोटेगावदरम्यान अंशतः रद्द, मनमाड-नांदेड (०७७७८) २० ते २८ जून, काकीनाडा-श्रीसाईनगर शिर्डी (१७२०६) २५ व २७ जूनला नगरसोल-शिर्डी अंशतः रद्द.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.