आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड:बियाणी कुटुंबामध्ये आर्थिक कलह; अनिता बियाणींची दिराविरुद्ध तक्रार

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची हत्या होऊन अवघे दोनच महिने होत आहेत. अजून पोलिस तपासही पूर्ण झाला नाही तोच बियाणी कुटुंबात आर्थिक कलह उफाळला आहे. बियाणी यांच्या पत्नी अनिता बियाणी यांनी आपले दीर प्रवीण बियाणींविरुद्ध हिशेबाची हार्डडिस्क चोरल्याची तक्रार दिली आहे. यावरून विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे बियाणी कुटुंब पुन्हा चर्चेत आले आहे.

बियाणी कुटुंबात भावजय व दिरात आर्थिक कलह उफाळून आला आहे. संजय बियाणी यांच्या पत्नी अनिता यांनी आपले दीर प्रवीण बियाणी यांनी अनिता बियाणींच्या मालकीच्या राज मॉल येथील फायनान्स ऑफिसमधून तोशिबा कंपनीची १ टीबी क्षमतेची संपूर्ण आर्थिक व्यवहारांची माहिती असलेली हार्डडिस्क चोरून नेली आहे, अशी तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामुळे बियाणी हत्याकांड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रवीण बियाणी हे गुन्हा दाखल होण्याअगोदर छातीत त्रास होत असल्याच्या कारणावरून शहरातील विवेकानंद हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. खबरदारी म्हणून विमानतळ पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये पोलिस गार्ड तैनात केला आहे.

प्रवीण बियाणींचीही तक्रार
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर अनिता संजय बियाणींसोबतच्या बाउन्सर्सनी मारहाण केल्याची तक्रार दवाखान्यात उपचार घेताना संजय बियाणींचे बंधू प्रवीण बालाप्रसाद बियाणी यांनी दिली आहे. याअगोदर अनिता बियाणींच्या तक्रारीवरून संजय बियाणींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...