आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास:दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत नांदेड विभागात विद्युतीकरणाला वेग

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण मध्य रेल्वेअंतर्गत नांदेड विभागात सध्या विद्युतीकरणाचे काम हाती घेतले आहे. प्रामुख्याने मुदखेड, परभणी, मनमाड, आदिलाबाद, परळी वैजनाथ, लातूर ते कुर्डुवाडी, पूर्णा ते अकोला या विद्युतीकरणाचे काम वेगात सुरू आहे. दरम्यान, ३० नोव्हेंबरला पांगरी (जि.सोलापूर) ते औसा रोड (जि.लातूर) या मार्गावर विजेवरील इंजिन धावले. यापूर्वी कुर्डुवाडी ते पांगरीदरम्यान ही चाचणी झाली होती. सध्या मनमाड ते परभणी या लोहमार्गावर विद्युतीकरणाचे काम दौलताबादपर्यंत जवळपास पूर्णत्वास येत आहे. तर, दौलताबाद ते जालना यामध्ये विद्युत पोल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात तर जालना ते परभणी पाया भरण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर परभणी (आऊटर) ते परळी वैजनाथपर्यंत (आऊटर) वायरिंग व पोल उभारणीचे काम जवळपास पूर्ण असून पूर्णा (आऊटर) ते अकोला जंक्शनपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले. यापूर्वी सीआरएस इन्स्पेक्शन वाशिमपर्यंत यापूर्वीच झाले. काही दिवसांपूर्वीच हिंगोली ते अकोल्यापर्यंत काचीगुडा-नरखेड इंटरसिटी एक्स्प्रेसला विद्युत इंजिनवर प्रायोग‍िक तत्त्वावर चालवण्यात आले. यामुळे आर्थिक बचत होऊन प्रवासाचा वेगही वाढेल. डिसेंबर २०२४ पर्यंत विद्युतीकरणाचे ध्येय रेल्वेकडून निश्चित केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मराठवाड्यासाठी अंकाई ते औरंगाबाद दुहेरीकरणाला मंजुरी? आगामी अर्थसंकल्पामध्ये मराठवाड्याला अंकाई ते औरंगाबाद दुहेरीकरणाची मंजुरी मिळून निधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या मार्गामुळे परभणी ते मनमाडमधील ९८ किलोमीटर असलेला अंकाई ते औरंगाबाद हा मार्ग झाल्यास रेल्वे विभागाच्या वेळेची बचत होईल व मोठ्या प्रमाणात रेल्वेगाड्यांची संख्या व मालवाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठवाड्यात विकासाला चालना मिळेल. परभणी ते औरंगाबाद सर्वेक्षणाला मंजुरी प्रलंबित असून ती मिळाल्यास पूर्णा-परभणी ते मनमाड एकेरी मार्ग, दुहेरीकरण झाल्यास जनतेला व रेल्वेलाच मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे रेल्वे प्रवासी संघटनेचे अरुण मेघराज यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...