आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाव गडगडले:अतिवृष्टीचे संकट;  जळगाव, एमपीतील केळी बाजारात; भाव 500 रुपयांवर, नांदेडमध्ये प्रतिक्विंटल 2200 रु. होता दर

शरद काटकर | नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीने विविध पिकांचे अताेनात नुकसान झालेले असताना केळीलाही माेठा फटका बसला आहे. नांदेड येथील अर्धापूरच्या केळीला क्विंटलमागे दाेन हजार ते २२०० रुपये क्विंटल असा आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी भाव मिळाला हाेता. पण १५ दिवसांतच दर चारपटीने घसरले. सध्या ५०० रुपये क्विंटलने केळी विकली जात आहे. अतिवृष्टीसह मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व जळगावातील केळी बाजारात दाखल झाल्याने ही स्थिती उद्भवल्याचे शेतकरी सांगत आहेत.

केळी उत्पादनात राज्यात जळगावनंतर नांदेड जिल्ह्याचा नंबर लागतो. अर्धापूरच्या केळीला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश, परदेशातही मागणी आहे. दरम्यान, श्रावण संपण्यापूर्वीच ठोक बाजारात केळीचे भाव अचानक घसरले आहेत. २,२०० हजार रुपये क्विंटल या भावाने विकली जाणारी केळी ५०० रुपये क्विंटलवर आली. नांदेडसह अर्धापूर, भोकर आणि मुदखेड तालुक्यात प्रामुख्याने केळी पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. जिल्ह्यात साधारण १५ हजार हेक्टरवर केळी पिकाचे लागवड क्षेत्र आहेे. दरम्यान, गतवर्षी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. लागवडीचे क्षेत्रही घटले होते. मागील तीन वर्षात केळी उत्पादकांना सतत संकटांना तोंड द्यावे लागले. जूनमध्ये मागणीच्या तुलनेत उत्पादन नसल्याने केळीच्या दरात विक्रमी वाढ झाली. विक्रमी भाव मिळाल्याने शेतकरीही समाधान व्यक्त करत होते. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून अचनाक केळीचे दर चारपटीने घसरले आहेत.

केळीवर चमक राहिली नाही अन् मालही संपतोय ^अतिवृष्टीमुळे केळीच्या उत्पादनावर परिणाम झाला. केळीवर चमक राहिली नाही. या काळात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर व जळगाव येथील केळीही मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली. इतर राज्यांत सध्या तिला अधिक मागणी आहे. आपल्याकडील केळीची मागणी घटली आहे. सध्या जिल्ह्यातील केळीचा माल संपत आला आहे. - गजानन भांगे, शेतकरी अर्धापूर.

वातावरणातील बदलामुळे केळीवर रोगाचा प्रादुर्भाव ^मागील एक दीड महिन्यात अतिवृष्टी झाली. अतिपाऊस आणि दमट वातावरण, केळीच्या बागांमधून पाण्याचा निचरा न झाल्याने अद्रता वाढली आहे. यामुळे केळीवर भेगा पडल्या आहेत. याश‍िवाय खालच्या बाजूस बुरशी झाली आहे. ही केळी खाण्या योग्य राहत नाही. त्यामुळे मागणी कमी होते. आपआप दर कमी होतात. परभणी, हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांच्या यासंबंधी तक्रारी आल्या होत्या. - प्रा.डॉ.बी.एम. कलालबंडी, उद्यान विद्या विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी.

औरंगाबाद जिल्ह्यात उत्पादन खर्चही निघेना ^केळीला महिनाभरापूर्वी २००० ते २५०० पर्यंत प्रतिक्विंटल बाजारभाव हाेता. आैरंगाबाद जिल्ह्यात कन्नड, साेयगाव तालुक्यात केळीचे माेठे उत्पादन हाेते. एकरी ४० ते ५० हजार रुपये खर्च येताे. भाव कमी झाल्याने हा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. महिनाभरापूर्वी १ हजारापर्यंत भाव उतरले आहेत. गुजरातहून केळीची आवक वाढल्याने भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. -प्रवीण वाडेकर, शेतकरी, किन्ही, ता. साेयगाव.

बातम्या आणखी आहेत...