आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे हदगावमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीने पीक वाहून गेल्याने नुकसान झाले. बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे, या चिंतेत हदगाव तालुक्यातील मौजे बामणी तांडा येथे शेतकरी बाळू रामराव राठोड (२७) यांनी विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना एक सप्टेंबर रोजी घडली. जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरलेले बियाणे वाहून गेले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. बियाण्यांचा खर्च निघणे अवघड झाले आहे. बँकेचे घेतलेले कर्ज कसे फेडावे या विवंचनेत अनेक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. ऑगस्ट महिन्याअखेर जवळपास २७ शेतकऱ्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, हदगाव तालुक्यातील मौजे बामणी तांडा येथील शेतकरी बाळू रामराव राठोड यांनी शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. अतिवृष्टीमुळे त्यांचे सोयाबीन पीक वाहून गेले. नुकसान झाल्याने ते नेहमी चिंतेत राहत होते. बँकेचे कर्ज कसे फेडावे? उदरनिर्वाह कसा करावा? या चिंतेत ते होते. त्यांनी एक सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता स्वतःच्या शेतात विष घेतले. त्यांना उपचारासाठी नांदेडमधील विष्णुपुरी येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मनाठा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...