आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष पिऊन आत्महत्या:नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सततची नापिकी व बँकेच्या कर्जाला कंटाळून मुखेड येथे एका शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी घडली. किशन शेषराव शिंदे (२४) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. कंधार तालुक्यातील मसलगाव येथील रहिवासी किशन शेषराव शिंदे हे सततच्या नापिकीला व बँकेच्या कर्जाला कंटाळून गेले होते. या तणावात राहून त्यांनी २ नोव्हेंबर रोजी मुखेड येथील मोतीनाल्याजवळील चिंचेच्या झाडाखाली विषारी औषध पिऊन आत्महत्या केली.

याप्रकरणी पद्माकर बालाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले असून हातचे पिक गेल्याने आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...