आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:बापानेच चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरी पात्रात सोडले, नांदेडच्या नारनाळीतील घटना, धर्माबाद तालुक्यात मृतदेह आढळला

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा मुलगा माझा नाही म्हणत चारवर्षीय चिमुकल्याला पोत्यात बांधून गोदावरी पात्रात फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील नारनाळी (ता.कंधार) येथे २८ मार्च रोजी घडली. अभिषेक माधव देव्हारे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

आरोपी माधव देव्हारे याला दोन मुले आहेत. माधवने आपल्या पत्नीवर संशय घेत होता. लहान मुलगा अभिषेक हा माझा नाही, असा वाद तो आपल्या पत्नीसोबत घालत होता. २८ मार्चला अभिषेक हा गावात खेळत असताना आरोपी माधवने त्याला गावाला जायचे, असे सांगत रिक्षात बसवून नायगाव तालुक्यातील राजेर येथील गोदावरी पात्राकडे नेले. माधवने चिमुकल्या अभिषेकला पोत्यात बांधून नदीत फेकले. घरी अभिषेक आढळून न आल्याने नातेवाइकांनी कंधार पोलिस ठाण्यात २९ मार्च रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसी खाक्या दाखवताच कबुली : कंधार ठाण्याचे पोलिस निरीक्षक पडवळ, पोलिस उपनिरीक्षक इंद्राळे यांना माधववर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच माधवने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने ज्या ठिकाणी मुलाचा मृतदेह फेकला त्याचा शोध घेतला असता तो धर्माबाद तालुक्यातील येल्लापूरच्या शिवारात पोत्यात आढळून आला.

बातम्या आणखी आहेत...