आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगीचा विळखा:नांदेडमध्ये गादीघर, चिकन सेंटर आणि ऑटोमोबाइलच्या दुकानांना आग

नांदेड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील तरोडा नाका परिसरातील एका गादीघराला शुक्रवारी दुपारी आग लागली. त्यानंतर ऑटोमोबाइल व चिकन सेंटरसह इतर सहा दुकानांना आगीने विळख्यात घेतले. अग्निशमन दलाने ३ बंबांच्या माध्यमातून तब्बल दीड तास शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण लाखोंचे नुकसान झाले. गादीघरातील कापूस व रुई पसरलेली असल्यामुळे व आजूबाजूची दुकाने पत्र्याची होती. एक दुकान ऑटोमोबाइलचे असल्याने त्यातील ऑइलच्या साठ्यामध्ये आग जास्तच पसरली.

बातम्या आणखी आहेत...