आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण:नांदेडमध्ये गुंठेवारी विभागाला आग; कागदपत्रे जळून खाक

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात असलेल्या गुंठेवारी विभागाला गुरुवारी (१५ डिसेंबर) मध्यरात्री १२.१५ वाजता सुमारास अचानक आग लागली. या आगीत गुंठेवारीच्या अनेक महत्त्वाच्या रेकॉर्ड असलेल्या संचिका जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच मनपाच्या अग्निशमन विभागाचे वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आगीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यात आले. आग आटोक्यात आली नसती व जराही विलंब झाला असता तर आगीने संपूर्ण बचत भवन आपल्या कवेत घेतले असते, अशी माहिती अग्निशमन विभागाचे शेख रईस पाशा यांनी दिली आहे. घटनास्थळी उपजिल्हाधिकारी पठाण यांनी भेट देऊन आगीची पाहणी केली. या आगीमागील कारण स्पष्ट झालेले नाही.

आगीच्या घटनेत इतर संबंधित विभागात कागदपत्रे सुरक्षित; शंका घेऊ नये : बचत भवनातील आगीच्या घटनेत जळालेल्या संचिकेतील कागदपत्रांच्या सर्व प्रती टाऊन प्लॅनिंग विभागाकडे सुरक्षित आहेत. शासनस्तरावर अनेक ठिकाणी कागदपत्रांच्या प्रती द्याव्या लागत असल्याने या प्रती इतर संबंधित विभागातून त्या उपलब्ध करून घेत आहोत. बचत भवनात आग लागल्यामुळे त्या कागदपत्रांबाबत कोणतीही शंका बाळगायचे कारण नाही, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...