आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये भीषण आग:तरोडानाका परिसरातील दुकाने भस्मसात, व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड शहरातील तरोडा नाका परिसरात शुक्रवारी सकाळी एका गादी घर आणि चिकन सेंटरला आग लागली. त्यानंतर आजूबाजूच्या दुकानांनाही आगीने घेरले. त्यामुळे परिसरात आगीचे मोठे लोळ उठले होते. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, आग लागल्यानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर तब्बल दीड तासाने आग आटोक्यात आली. या आगीमुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या टीन पत्र्यांमधील एका गादी घराला दुपारी १२ च्या सुमारास आग लागली. त्याच्या शेजारी असलेल्या चिकन सेंटर दुकानांनाही आगीने आपल्या कवेत घेतले. त्या सोबतच शेजारी दुसऱ्या चिकन दुकानाला आग लागली. पाहता-पाहता तीन-चार दुकानांना आग लागल्याने आगीचा लोळ व धूर मोठ्या प्रमाणात दिसत होता. लगेच महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे वाहन त्या ठिकाणी येऊन आग आटोक्यात आणली. या वेळी बघ्यांची प्रचंड गर्दी होती. दरम्यान या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती. आगीमध्ये नेमके किती रुपयांचे नुकसान झाले हे अद्याप समजले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...