आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी शिक्षणमंत्री यांचा अमृतमहोत्सव सोहळा:शरद पवारांसह पाच मंत्री शनिवारी नांदेड दौऱ्यावर

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व राज्यातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा अमृतमहोत्सव सोहळा १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता मादसवाड इस्टेट नमस्कार चौक, म्हाळजा बायपास येथे आयोजित केला आहे, अशी माहिती सोहळा संयोजन समितीचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व समितीचे उपाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

माजी खा. केशवराव धोंडगे व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे यावेळी उपस्थित राहतील. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री ऑनलाइन हजेरी लावणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, एमजीएमचे सचिव अंकुशराव ऊर्फ बाबूराव कदम आदींची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमामध्ये शाल, हार, पुष्पगुच्छ आणू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...