आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा:नांदेडच्या माजी आमदार अनुसया खेडकरांसह 18 जणांना सक्तमजुरी

नांदेड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईच्या विरोधात नांदेडच्या तत्कालीन आमदार अनुसया खेडकर यांनी आंदोलन केले होते. त्या वेळी बसगाड्यांवर दगडफेक करण्यात आली. यात अनेक पोलिस जखमी झाले होते. नांदेडचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी मंगळवारी माजी आमदार अनुसया खेडकर यांच्यासह एकूण १९ जणांना सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकास एक लाख ६० हजार ७५० रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा सुनावताना मा.आ. खेडकर उपस्थित नव्हत्या. त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले. इतर १८ आरोपी न्यायालयात हजर होते. आंदोलनावेळी दगडफेकीत लातूर आगाराची बस व आंध्र प्रदेशच्या बससह एकूण १० वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यात मनपाचे व पोलिसांचे प्रत्येकी एक वाहन होते.