आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातांत चार जणांचा मृत्यू

नांदेड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड जिल्ह्यात बुधवारी (ता.४) वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला. जानापुरी-विष्णुपुरी रस्त्यावर कर्नाटक राज्यातील बस क्रमांक (केए ३८ एफ १०२१) नांदेडकडे येत असताना एका मालवाहू टेम्पोला धडकली. यात टेम्पोमधील दोन जण ठार झाले. राम लक्ष्मण चिंतलवार (३८) व धोंडिबा लक्ष्मण केंद्रे (५५) अशी मृतांची नावे आहेत.

दुसरी घटना शंकरनगर-देगलूर राज्य महामार्गावरील बिलोली तालुक्यातील बिजूरजवळ झाली. कार (एमएच २० सीएस १८०१) व स्कूटीची (एमएच २६ सीबी ४३२६) धडक झाली. या अपघातात स्कूटीवरील बिजूर येथील मरिबा रामा टोम्पे (४०) यांचा मृत्यू झाला, तर तिसरी घटना लोह्यातील कंधार रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या बसवराज शिवराज सोनवळे या तरुणास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने ३० एप्रिल रोजी उडवले होते. चार दिवसांनी बुधवारी (ता.४) पहाटे नांदेडच्या खासगी रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, त्या टिप्परचा अद्याप शोध लागला नसून कारवाईच्या मागणीसाठी नातेवाइकांनी तरुणांचा मृतदेह लोहा तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता आणला होता.

नांदेड : विष्णुपुरी-जानापुरी रस्त्यावर बस-टेम्पोचा भीषण अपघात झाला.

बातम्या आणखी आहेत...