आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे विभागाने नांदेड आणि तिरुपती रेल्वेच्या चार फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड-तिरुपती (०७६४१) ही रेल्वे १ आणि ८ ऑगस्ट रोजी नांदेड रेल्वेस्थानकावरून रात्री १०.४५ वाजता निघून दुसऱ्या दिवशी १०.१० वाजता पोहोचेल.
तिरुपती-नांदेड (०७६४२) ही रेल्वे २ व ९ ऑगस्ट रोजी तिरुपती स्थानकावरून रात्री ११.५० वाजता निघून दुसऱ्या दिवशी ११.५४ वाजता पोहोचणार आहे.
नांदेड- तिरुपती-नांदेड (०७६४१/४२) या विशेष रेल्वेच्या चार फेऱ्या होणार आहेत. पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, सिकंदराबाद, काचिगुडा, उमदानगर, शादनगर, मेहबूबनगर, गडवाल, कुर्नूल सिटी, ढोणे, गुती ताडीपत्री, येरागुंटला, कडप्पा, रझामपेट आणि रेनिगुंटा स्टेशन दोन्ही दिशांना येथे थांबतील. या विशेष गाड्यांमध्ये एसी २ टियर, एसी ३ टियर, स्लीपर आणि सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील, दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कळवले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.