आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पिताना वानराच्या पिल्लाचे मुंडके अडकले:नांदेडच्या पथकाला पिल्लू हाती लागेना; औरंगाबादहून आले पथक अन् केली सुटका

नांदेड8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणी पिण्याचा प्रयत्न करताना वानराच्या पिल्लाचे मुंडके तांब्यात अडकले. काही केल्या ते निघेना. पोटाला कवटाळून त्याची आई हतबल होऊन गावातील गल्लीबोळात फिरू लागली. पिल्लाला धोका होईल म्हणून ती त्याला खालीही सोडत नव्हती. ग्रामस्थांनी वन विभागाला कळवले. १४ जणांचे पथक रात्रभर मादी वानराचे माग काढत होते. पण यश आले नाही. नंतर औरंगाबादहून रात्रभर प्रवास पहाटे चौघे आले अन् डार्ट गनने त्या पिल्लाला बेशुद्ध करत त्याचे मुंडके ताब्यातून काढत त्याची सुटका केली. २४ तासांचा हा रेस्क्यू ऑपरेशन नांदेड जिल्ह्यातील पाचपिंपळी येथे पार पडला.

वन परिक्षेत्र देगलूर (प्रा) अंतर्गत येणाऱ्या बिलोली तालुक्यातील पाचपिंपळा येथे १७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता पाणी पिताना वानराच्या पिल्लाचे मुंडके तांब्यात अडकले होते. ग्रामस्थांनी तत्काळ देगलूर वन परिक्षेत्र विभागाला कळवले. मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, नांदेडचे उपवनसंरक्षक केशव बाबळे, नांदेडचे सहाय्यक वनसंरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र देगलूर (प्रा) अधिकारी सागर हराळ, निखिल हिवरे हे वनपाल एस.एस. गेडाम, शेख फरीद तसेच वनरक्षक गजानन कलवार, गिरीश कुरुडे, ज्ञानेश्वर मुसळे, कैलास होनशेटे, माधव कुमारे, लक्ष्मण शिंदे, मारोती पानगटवार व वनमजूर गायकवाड, चव्हाण, बालाजी बत्तलवाड यांनी त्या वानराच्या पिलास पकडण्याचा प्रयत्न केला. पण, ते वानर सापडले नसल्याने औरंगाबाद येथील रेस्क्यू टीमचे कर्मचारी प्रकाश सूर्यवंशी, एस. के. गुसिंगे, विश्वास साळवे व पी.एम.अहिरे यांना पाचारण करण्यात आले. हे पथक १८ जूनला पहाटे ५ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बारा तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर सायंकाळी ७ वाजता पिलाला पकडून त्याची सुटका केली. नंतर त्याला नैसर्गिक आधिवासात सोडले.

तांब्या कापून सुटका : भीतीपोटी त्याची आई त्याला पोटाशी घेऊन फिरत होती. पिल्लू हाती लागत नसल्याने औरंगाबाद येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले. त्यांनी डार्ट गनचा वापर करून पिल्लाला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन कटरच्या साहाय्याने तांब्या कापून त्याची सुटका केली. - निखिल हिवरे, वन अधिकरी, वनपरिक्षेत्र देगलूर (प्रा).

बातम्या आणखी आहेत...