आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमान यात्रा एक सामाजिक आध्यत्मिक चळवळ:बंधुभाव निर्माण करणारी घुमान यात्रा आज रवाना

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नानक साई फाउंडेशनची घुमान यात्रा २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अमृतसर स्पेशल एक्स्प्रेसने पंजाबला रवाना होणार आहे. संतशिरोमणी भक्त नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जन्मशताब्दीनिमित्त २ ते १२ नोव्हेंबरदरम्यान आठवी नांदेड ते अमृतसर “घुमान यात्रा” आयोजित करण्यात आली आहे.

घुमान यात्रा एक सामाजिक आध्यत्मिक चळवळ असून संत नामदेव महाराज यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करणे यासोबतच पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव जागृत करून सांस्कृतिक देवाण-घेवाण करणे हा या चळवळीचा हेतू आहे.

संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी तीर्थक्षेत्र घुमान -सुवर्णमंदिर अमृतसर-शक्तिपीठ, माता नैना देवी - शक्तिपीठ, माता ज्वाला देवी (हिमाचल प्रदेश) - आनंदपूर साहिब (तख्त)-आशिया खंडातील सर्वात उंच आणि भव्य भाकरा नांगल धरण - पंजाबच्या संस्कृतीचा देदीप्यमान इतिहास असलेले विरास्ते खालसा म्युझियम - सुलतानपूर लोधी- गोविंदवाल साहिब -परजिया कलान-कार्तिकी स्वामी- वाघा अटारी बॉर्डर - जालियनवाला बाग - फतेहगड साहिब - पानिपत - कुरुक्षेत्र - दिल्ली असे भ्रमण आणि दर्शन घडवते. २ नोव्हेंबरला यात्रा स्पेशल अमृतसर एक्स्प्रेसने नांदेड येथून निघणार असून हिंगोली, अकोलामार्गे पंजाबकडे मार्गस्थ होईल. ३०० भाविक यात्रेत सहभागी आहेत.

घुमान यात्रेचे नांदेड रेल्वेस्थानकावरून प्रस्थान २ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घुमान यात्रेचे प्रस्थान होणार आहे. यात्रेला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहून आमचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन नानक साई फाउंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...