आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाययोजना:शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्या : कृषिमंत्री सत्तार

नांदेड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे नवे कृषिमंत्री अब्दुल सत्तार रविवारी नांदेड, लातूर दौऱ्यावर होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी रविवारी (२१ ऑगस्ट) नांदेड येथे आढावा बैठक घेतली. या वेळी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्याचे आदेश दिले. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री अशोकराव चव्हाण यांनी तुम्ही ओके असाल पण शेतकरी ओके नाहीत, अशी टीका केली होती. याला उत्तर देताना त्यांनी आम्ही तर ओके आहोत, शेतकरीही ओके होतील, असे म्हणत मंत्री सत्तार लातूरकडे रवाना झाले.

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन शोध घेण्याची गरज असल्याने जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ, वर्ग एक अधिकारी किंवा मंत्री यांनी एक दिवस शेतकऱ्यांच्या गावी जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात रविवारी मराठवाडा विभागीय पातळीवरील कृषी आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, तीन दिवसांची विधानसभेची सुटी होती. या सुटीचा फायदा घेऊन १,१०० किलोमीटरचा प्रवास करत विदर्भ, मराठवाड्याच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा केला आहे. या पाहणी दौऱ्यात नांदेडच्या लोकप्रतिनिधींनी सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु, शासनाचे काही निकष आहेत. ते सर्व तपासले जातील. यासंदर्भात माझे उत्तर मी सोमवारी विधानसभेत देईल, असेही कृषिमंत्र्यांनी म्हटले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी जी घोषणा केली त्यानुसार जुलैमधील पहिल्या टप्प्यातील पंचनामे झाल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने बैठकीत महावितरण अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. जिल्हा नियोजनमधून प्रत्येक मतदारसंघासाठी ५० रोहित्रांची तरतूद करून ते शिल्लक ठेवावेत, असात्यांनी सल्ला त्यांनी दिला.

अशोक चव्हाण यांच्या घरी बंद दाराआड चर्चा पत्रकार परिषदेनंतर मंत्री सत्तार अशोकराव चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अर्धा तास त्यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावर विचारल्यावर ते म्हणाले की, अशोकराव माझे नेते आहेत. आमच्यात राजकारणावरून कुठलीही चर्चा झाली नाही. पण या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते.

आधी महाविद्यालय आणा, नाव देण्याचा निर्णय नंतर नांदेड येथे शासकीय कृषी महाविद्यालयासाठी आपण यापूर्वीच प्रस्ताव पाठवला होता. याला डॉ.शंकरराव चव्हाण यांचे नाव द्या, अशी मागणी अशोकराव चव्हाण यांनी कृषीमंत्र्यांकडे केली. त्यानंतर आपणही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे आ. कल्याणकर म्हणाले व महाविद्यालयाला आनंद दिघे यांचे नावे द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी महाविद्यालयाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव असे म्हटले. सर्वांचे ऐकून आधी महाविद्यालय आणा नंतर नाव याबाबत ठरवू, असे सत्तार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...