आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारस्त्यावर पडलेल्या एका जॅकच्या मोहापायी गाडी थांबवलेल्या वाहनधारकास दीड लाखाला लुटण्यात आल्याची घटना नरसी-देगलूर रस्त्यावरील कुंचेली फाट्याजवळ १९ जून रोजी दुपारी दीड वाजता घडली. या वेळी चोरट्यांनी मारहाण केली.
खानापूर (ता. देगलूर) येथील पंक्चर दुकानचालक जमील खान अहमद खान पठाण (३५) हे पत्नी, भावजय व पुतण्यासह देगलूरहून गावाकडे कारने (एमएच २६ एल १०३५) जात होते. नरसी-देगलूर रस्त्यावरील कुंचेली फाट्याजवळ (ता. बिलोली) अनोळखी चार चोरट्यांनी रस्त्यावर जॅक ठेवला. ते रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसले. जॅक पाहून जमीलखान पठाण यांनी गाडी थांबवली. ते खाली उतरताच दबा धरून बसलेल्या चार जणांनी एकदम त्यांच्यावर येऊन झडप घातली व पुतण्याला मारहाण केली. गाडीतील महिलांचे दागिने, पुतण्याजवळील रोख रक्कम व सहा मोबाइल असा एकूण एक लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. रामतीर्थ पोलिस ठाण्यात अनोळखी चार जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव व त्यांच्या पथकाने भेट दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.