आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:रस्त्याला बाबासाहेबांचे नाव द्या म्हणत पालकमंत्री गिरीश महाजन यांचा ताफा अडवला

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वजिराबाद ते पक्की चाळ रस्त्याला पूर्वीप्रमाणेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुक्रवारी (४ नाेव्हेंबर) महापालिकेसमोर ताफा अडवला. मंत्री महाजन यांनीही वाहनातून खाली उतरून मागण्यांचे निवेदन स्वीकारून नवीन ठराव रद्द करण्याच्या सूचना मनपा आयुक्तांना देणार असल्याचे आंदोलकांना सांगितले.

स्टेट बँक ऑफ हैदराबाद (महाजन यांचा वाडा) वजिराबाद ते पक्की चाळ एनटीसी मिलपर्यंतच्या रस्त्याला तत्कालीन नगरसेवक ॲड.मा.मा.येवले यांनी नगराध्यक्ष दिवंगत व्यंकटराव तरोडेकर यांच्या माध्यमातून सन १९६७ साली ठराव घेऊन “डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग’ असे नाव दिले आहे. या वेळी सिमेंटच्या पाट्यांवर नाव कोरून जुनी स्टेट बँक ऑफ हैदराबाद (महाजन यांचा वाडा) वजिराबाद ते पक्की चाळ एनटीसी मिलपर्यंतच्या रस्त्याला नावांच्या पाट्या लावलेल्या होत्या. त्या वेळी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभा किंवा स्थायी समितीमध्ये ठराव मंजूर करण्यात आल्याचे ॲड.मा.मा.येवले सांगतात, असे दलित सेनेचे राज्य संघटक संजय वाघमारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...